जिल्ह्यातील एका 'टोळी'मुळेच भाजपचे नुकसान : विजय वहाडणे

ही दुरवस्था सुधारण्यासाठी सगळ्यांनाच जागे व्हावे लागेल. सगळेच गोडबोले-होयबा एकत्र येऊन पक्षाचे भले करू शकत नाहीत. -विजय वहाडणे
Vijay Vahadne launches attack against some leaders in BJP
Vijay Vahadne launches attack against some leaders in BJP

नगर  : " जिल्ह्यातील भाजपच्या एका टोळीनेच मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचा उद्योग आजवर केला. त्यातच पक्ष सहकारसम्राटांच्या दावणीला बांधून मनमानी करणाऱ्या प्रवृत्तींना मी जाहीरपणे विरोध करतो. त्यांच्या प्रवृत्तीत सुधारणा न झाल्यास येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जाहीरपणे पक्षविरोधी भूमिकाही घेईन,'' अशा शब्दात  नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपला घरचा आहेर केला . 

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात फिरून या टोळीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली, तरी मागे-पुढे पाहणार नाही, असे सांगून वहाडणे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीतही मी याच कारणाने उमेदवारी केली. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षविरोधी भूमिका नाइलाजाने घेण्यास भाग पाडायचे व स्वतः मात्र एकनिष्ठ म्हणून पदांचे तुकडे वाटून घ्यायचे, अशी अवस्था जिल्ह्यातील भाजपची झाली आहे." 

 ते पुढे म्हणाले,"ही दुरवस्था सुधारण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यासाठी सगळ्यांनाच जागे व्हावे लागेल. सगळेच गोडबोले-होयबा एकत्र येऊन पक्षाचे भले करू शकत नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात केवळ सभासद नोंदणीचे नाटक करायचे व त्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर काहींनी दलाली करायची, हे आता तरी बंद व्हायला हवे.''  

 ते पुढे म्हणाले,"लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजप व शिवसेना महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. मात्र, त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पानिपत झाले. त्यामुळेच भाजपला आयारामांच्या दावणीला बांधूच नका, असे बारा वर्षांत मी अनेकदा सांगितले.

परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचा उलटा परिणाम झाला. पक्षातील काही दलालांनी मलाच पक्ष संघटनेपासून बाजूला केले. त्यामुळे या प्रवृत्तीला विरोध म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती", असेही विजय वहाडणे यांनी  सांगितले . 


 ते पुढे म्हणाले, "नगराध्यक्षपदाची निवडणूक नाइलाजाने अपक्ष म्हणून लढविली. महाराष्ट्रात सर्वांत जास्त मताधिक्‍य मिळवून नगराध्यक्ष झालो. भाजपच्या मुखपत्रात (मनोगत) माझा भाजपचे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखही झाला. तसेच तुमच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही, असे मला प्रदेश भाजपचे पदाधिकारी मुकुंद कुलकर्णी नेहमी सांगतात. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com