पंकजा मुंडेंच्या स्वागताला डझनभर आमदार

...
pankaja munde visits assembly
pankaja munde visits assembly

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपच्या ताकदवान नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गुरुवारी विधीमंडळात आल्या.  पंकजाताईच्या स्वागतासाठी डझनभर आमदार विधीमंडळाच्या गेटवर हजेरी लावून होते.

उदयनराजे आणि रामदास आठवलेंचा उमेदवारी अर्ज भरून पंकजाताईंनी जेमतेम पाऊणतासांच विधीमंडळातून काढता पाय घेतला.  पंकजा यांच्याभोवती झालेल्या चाहत्यांच्या गर्दीने त्यांचा करिष्मा दाखवून दिला.

विधीमंडळात गुरुवारी पाऊणच्या सुमारास पंकजाई विधमंडळात आल्या. तेव्हा दारात आमदार मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तोपर्यंत माध्यमांच्या कॅमेयांनी पंकजाताईंची वाट अडविली. त्यातून पुढे विधीमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत आलेल्या पंकजा यांची राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाडांनी आपुलीने विचारपूस केली. तेवढ्यात पायऱ्यांवर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजांसोबत एकत्रित माध्यमांना फोटो दिला. त्याचवेळी उदयनराजेंनी पंकजाताईंशी हस्तांदोलन केले आणि पंकजाताईंनी त्यांना राज्यसभेसाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उदयनराजे, आठवलेंचा अर्ज भरण्यासाठी त्या गेल्या. ती प्रक्रिया पूर्ण होताच एक-दोघांच्या भेटी घेऊन पंकजाताई परत फिरल्या. तेव्हाही आमदारांसह विधीमंडळात कामानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांनी गराडा करीत, पंकजा यांच्यासोबत फोटो घेतले. जाता जाता माध्यमांना बाइट देऊन त्या आपल्या गाडीच्या दिशेने गेल्या.

विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर पक्षांगतर्गत नाराजीनाट्यामुळे त्या गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. पराभवानंतर विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील त्यांच्या आगमनाने जुन्या-नव्या चर्चा पुन्हा रंगल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com