कोरोना निगेटिव्ह झाला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला

कॅलिफोर्नियाहुन आलेला सातारा जिल्ह्यातील पहिला बाधित असलेल्या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा चौदाव्या (रविवारी) दिवशी कोरोना निगेटिव्ह आला. पण आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला
One Died Due to Corona in Satara District
One Died Due to Corona in Satara District

सातारा  : कॅलिफोर्नियाहुन आलेला सातारा जिल्ह्यातील पहिला बाधित असलेला 63 वर्षीय वृद्धाचा चौदाव्या (रविवारी) दिवशी कोरोना निगेटिव्ह आला. पण आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्याच्यावर उपचार करणाऱ्या फिजीशियन यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात सातारा शहराशेजारील खेड भागातील एका अपार्टमेंट मध्ये राहणारा हा 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कॅलिफोर्निया येथून आला होता. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्यांना सातारा जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. 14 दिवस उपचार केल्यानंतर रविवारी त्यांचा अहवाल तपासण्यासाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार रात्री त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. पण दुर्दैव म्हणजे आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

आज त्यांचे दुसऱ्या दिवशीचे नमुने घेऊन ते पुन्हा पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा पहाटे मृत्यू झाला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना बाधित सापडलेल्या पहिल्या दोन व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यापैकी एक ६३ वर्षीय वृध्दाचा आज मृत्यू झाला आहे.  सदर वृध्द रूग्ण आज पहाटे बाथरुमला जाताना खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या फिजीशियन यांनी त्याच्यावर सर्वोतोपरी उपचार केले.  उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यावर उपचार करणाऱ्या फिजीशियन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आज आरोग्य विभागाने संबंधितांवर माहुली येथे अंत्यसंस्कार केले. त्यापूर्वी संबंधित मृत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने व्हिडीओ कॉलिंगव्दारे आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घेतले. त्यांचा मुलगा सध्या कॅलिफोर्नियात आहे. 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे साताऱ्यात मुंबई सोडून आलेल्या निझरे ( ता.जावली) येथील व्यक्तीला 28 दिवसांनंतर कोरोना झाल्याचे काल स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभागापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com