मरकजहून नागपुरात आलेल्या एकामुळे नागपूर प्रशासनाचे दणाणले धाबे : त्याने कोरोनाची साखळी जोडली  

हा युवक मध्य नागपुरातील असून हा परिसर "लॉक डाऊन' करण्यात आला आहे. अहवाल कोरोनाबाधित येताच त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले. उपराजधानीतील कोरोनाबाधिताचा आकडा आता 17 वर पोहोचला.
corona 11
corona 11

नागपूर : कोरोनाच्या एका तपासणीच्या सायकलसाठी सुमारे 7 तासांचा कालावधी लागतो. एका दिवसात तीन सायकल तपासले जातात. मात्र मेयोतील कोरोना विषाणूच्या बाधेचे निदान करणाऱ्या प्रयोगशाळेतील एक पीसीआर बंद पडले. यामुळे नमुने तपासणीला विलंब होत आहे.

नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोविड-19 चाचणीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 25 नमुने तपासण्यात आले. दिल्लीतील मरकज येथून नागपुरात आलेला 32 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल पुढे आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. गेल्या चार दिवसांत एकही कोरोनाबाधित आढळला नाही. पण मरकजहून आलेल्या युवकाने कोरोनाची खंडित झालेली साखळी पुन्हा जोडली.

हा युवक मध्य नागपुरातील असून हा परिसर "लॉक डाऊन' करण्यात आला आहे. अहवाल कोरोनाबाधित येताच त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले. उपराजधानीतील कोरोनाबाधिताचा आकडा आता 17 वर पोहोचला. दिल्ली येथून परत आल्यानंतर वनामती येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मेयोत नमुने पाठवण्यात आले होते, परंतु येथील एक यंत्र बंद पडल्याने नमुने तपासणीला उशीर झाला. मात्र एम्समध्ये आज नमुने तपासणीत हा युवक कोरोना बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. दिल्लीतील निझामुद्दीनच्या मरकज येथे धार्मिक कार्यासाठी गेला होता. 14 मार्चच्या सुमारास रेल्वेने नागपूरात परत आला होता. सुरूवातीला कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसली असून साथ आजाराचे औषध घेत होता. जिल्हा प्रशासनाला मरकजहून नागपूरात परत आलेल्यांची यादी मिळताच पोलिसांच्या मदतीने त्याला  विलगिकरणात घेतले गेले.

639 व्यक्ती विलगीकरणात
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विभागात संशयित व बाधित नागरिकांची प्रत्येक स्तरावर तपासणी होत आहे. करोनाची लागण झालेल्यांपैकी शहरातील चौघे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. 4 एप्रिलच्या सकाळपर्यंत आमदार निवास, रविभवन व वनामती येथे एकूण 639 जण विलगिकरणात आहेत. विलगिकरणात असलेल्यांत निजामुद्दीनहून आलेल्या 407 जणांचा समावेश आहे. पैकी 127 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. या सगळ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंची कीट तसेच वायफाय आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत वैद्यकीय तपासणी, भोजन, चहा-नाश्‍ता तसेच विविध पुस्तके, वर्तमानपत्रे आदी सुविधा दिली जात असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

कोरोनासाठी 100 खाटा
कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रयोगशाळा तयार झाली. यासोबतच एम्समध्ये 100 खाटांचा आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला आहे. संशयित कोरोनाच्या रुग्णांच्या तपासणीसाठी कोरोना कॉर्नरमध्ये सुरू आहे. एम्सने 100 खाटांचे स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करून कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. एम्समध्ये मास्क, व्हेंटिलेटरसह इतरही अत्यावश्‍यक वस्तू तातडीने खरेदी करण्यात आल्या आहेत.

चार दिवसानंतर पॉझिटिव्ह
शहरात 31 मार्चनंतर 3 एप्रिल पर्यंत असे चार दिवस एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ही मनाला दिलासा देणारी बाब होती. मात्र मेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना संशयितांचा आकडा कमी होत नाही. मेयो-मेडिकलमध्ये 50 पेक्षा अधिक संशयित दाखल आहेत. त्यात दिल्ली येथील मरकज येथून नागपुरात आलेल्या पन्नासपेक्षा अधिक व्यक्तींना विलगीकरण कक्षात आणले आहे. बुधवारी रात्री हे नमूने तपासणीसाठी मेयोत पाठवले आहेत. नागपुरात 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला. यानंतर उपराजधानीत कोरोनाची दहशत पसरली. हा आकडा 16 वर पाच दिवस थांबला. परंतु दिल्लीतील मरकजून आलेल्या व्यक्तीने कोरोनाची खंडित झालेली साखळी पुन्हा जोडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com