once defeated so what`s : Sushilkumar | Sarkarnama

सोलापूरने एकदा पाडले म्हणून बिघडले कुठे? : सुशीलकुमार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सोलापूर : एकदा पाडले म्हणून बिघडले कुठे? सोलापूरच्या जनतेने मला एकदा नव्हे तब्बल 12 वेळा निवडून दिले आहे. एकदा चूक घडली तर कुठे बिघडले कुठे, असा सवाल करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाच्या जखमेवर फुंकर घातली.

सोलापूर : एकदा पाडले म्हणून बिघडले कुठे? सोलापूरच्या जनतेने मला एकदा नव्हे तब्बल 12 वेळा निवडून दिले आहे. एकदा चूक घडली तर कुठे बिघडले कुठे, असा सवाल करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाच्या जखमेवर फुंकर घातली.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा भाजपच्या शरद बनसोडे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यावर ते युवक काॅंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले की पराभवाच्या सहाव्या दिवसानंतर मी सोलापुरात पुन्हा काम चालू केले. या भागात मेघनाथ येमुल सारख्या युवा नेत्याच्या सुद्धा या ठिकाणी पराभव झाला. पण लोकशाहीत जय-पराजय होत असतो पराभूत झाला म्हणून घरात बसणाऱ्यांपैकी आम्ही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करत राहणार. माझ्याप्रमाणेच आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून रात्रंदिवस जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा फोल असल्याचेही सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी म्हणाले, आमची सत्ता आल्यास सोलापूरच्या यंत्रमागाचे कापड सैन्यासाठी घेतो. मोदी सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाले त्यांनी सोलापुरातून साडेचार मीटर तरी कापड खरेदी केले का? असा सवाल त्यांनी केला. मोदी मोठे नाटककार आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या भाषणांना जनता बळी पडली असल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला.

शिंदे म्हणाले, जीएसटी आणि नोटाबंदीने यंत्रमाग उद्योगाची कंबर मोडली. देशाचे हजारो कोटीचे नुकसान झाले. पंतप्रधान मोदी भाषणातून "हा या ना' असं विचारतात. पंतप्रधानांना कोण ना म्हणणार? पण सरकारचे गेल्या साडेचार वर्षात प्रत्येक आश्‍वासनाबाबत ना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने पूर्व भागातील युवकांचा आणि युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा  झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, महापालिका गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख