अभिमन्यू पवारांच्या मदतीला मित्र ओमप्रकाश शेटे आले धावून

Bhalerao Shete
Bhalerao Shete

औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे औसा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीतील घटक पक्षांसह इतरही अनेक घटक सक्रिय झाले आहेत. 

पवार यांचे विविध क्षेत्रात असणारे मित्र औशात दाखल झाले आहेत.  यात आता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग सांभाळणारे ओमप्रकाश शेटे यांचाही समावेश झाला आहे. शेटे पवार यांचे खास मित्र असल्याने सध्या ते औसा येथे तळ ठोकून आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिमन्यू पवार आणि ओमप्रकाश शेटे दोन अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. दोघांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनहिताची अनेक कामे केली.

शेटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता विभाग सोपवल्यानंतर या विभागाच्या वतीने चांगल्या प्रकारे काम कसे होऊ शकते हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. मंत्रालयात काम करताना अभिमन्यू पवार आणि शेटे यांची मैत्री झाली. जनहिताला प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.

आता अभिमन्यू पवार यांनी राजकीय वाटचाल सुरु केली आहे. महायुतीने त्यांना औसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या मित्राच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते औशात दाखल झाले. औसा येथे थांबून त्यांनी प्रचारात सक्रिय सहभागही घेतला आहे. पवार यांच्यासमवेत तसेच स्वतंत्रपणे त्यांनी काम सुरु केले आहे.

मतदारसंघात फिरत असल्याने अनेकजण आपली कामे करून घेण्यासाठी, रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना विनंती करत आहेत. अशा मंडळींना योग्य मार्ग दाखवतानाच अभिमन्यू पवार यांना विजयी करा, असे आवाहन करण्यास मात्र ते विसरत नाहीत . मित्राला गरज असताना स्वतः हून केली जाणारी ही मदत पवार यांच्यासाठी निश्‍चितच मोलाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com