Omi Kalani backs out for his mother Jyoti Kalani | Sarkarnama

उल्हासनगरात ओमी कलानीची आईसाठी माघार

दिनेश गोगी
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

उल्हासनगर : ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असल्याने त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे.

रामदास आठवले गटाचे उल्हासनगरातील जिल्हाध्यक्ष-नगरसेवक-गटनेते भगवान भालेराव यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी मागे घेतली नसल्याने उल्हासनगर विधानसभेत राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी, युतीचे कुमार आयलानी व बंडखोर अपक्ष भगवान भालेराव यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 

 सर्वाधिक 10 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.ओमी कलानी, कमलेश निकम, रविंद्र केणे या तीन अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उल्हासनगरविधानसभा मतदार क्षेत्रात 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. 

त्यात ज्योती कलानी-राष्ट्रवादी, कुमार आयलानी-भाजपा, राजेंद्र भालेराव-बीएसपी, साजनसिंग लबाना-बहुजन वंचित आघाडी, अशोक खवळे-पार्टी ऑफ यूनाइटेड इंडियंस,अपक्षात भगवान भालेराव,कमल बटिजा,ज्ञानेश्वर लोखंडे, जोगेंद्रसिंग खुसर, राजेश चंदवानी, काजल मूलचंदानी, लक्ष्मी वाल्मिकी, अब्दुल गफार शेख, राजकुमार सोनी, सिद्धार्थ साबळे, इब्राहिम अंसारी, संदिप गायकवाड यांचा समावेश आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मगदूम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय वाकोडे यांनी दिली.

माझी आई ज्योती कलानी आणि मि आम्ही दोघांनीही राष्ट्रवादी कडून उमेदवारी अर्ज सादर केला होता. आईचा अर्ज अधिकृत ठरला आणि माझा डमी अर्ज बाद झाला.पण अपक्ष उमेदवारी कायम होती. कलानी परिवारातून एकच उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनाच रिंगणात उतवले आहे. कॉंग्रेस,कवाडे गट आणि टीम ओमी कलानी हे जिंकण्यासाठी लढतील, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी व्यक्त केली.

मागच्या वेळेस युती नव्हती त्यामुळे तरीही कमी मतानी पराभव झाला होता. आता युती असल्याने विजय डोळ्या समोर दिसत असल्याचे युतीमधिल भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांनी सांगितले.

 युती असली तरी उल्हासनगरात आठवले गट भाजपा सोबत नाही. आठवले गट आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. पक्षाचा अर्ज बाद झाल्याने अपक्ष म्हणून परिवर्तना साठी निवडणूक लढवत असल्याचे मत भगवान भालेराव यांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख