omer khalid jnu news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश...ही यादी वाढतच आहे : उमर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे देशभरात द्वेष, रक्तपिपासूपणा आणि भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचाच हात असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद याने केला आहे. 

नवी दिल्ली : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे देशभरात द्वेष, रक्तपिपासूपणा आणि भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचाच हात असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद याने केला आहे. 

खालिदवर काल (ता. 13) दिल्लीतील ल्युटन्स परिसरात बंदुकीने हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. "गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या आणि मला सातत्याने मिळणाऱ्या धमक्‍या, यामुळे कधीतरी माझ्यावरही बंदुकीचा निशाणा धरला जाईल, हा अंदाज होताच. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश...ही यादी वाढतच आहे,' असे खालिदने त्याच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.

 माझ्यावर काल हल्ला करणारे खरे गुन्हेगार नसून द्वेषाचे वातावरण निर्माण करणारे सत्तेतील काही लोक आणि काही प्रसारमाध्यमे यास कारणीभूत असल्याचा आरोप त्याने केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख