olympian lalita babar nomineted as deputy collector | Sarkarnama

'माणदेशी एक्‍सप्रेस' ललिता बाबर बनल्या उपजिल्हाधिकारी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मलवडी (सातारा) : माणदेशी एक्‍सप्रेस ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे. 

ललिता बाबर-भोसले यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहांमध्ये येण्याचा मान पटकावला होता. या खेळात तिने नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत ललिता यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यास काल (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशीस मान्यता दिली. त्यामुळे ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे. महसूल विभागाच्या मान्यतेनंतर अंतिम नियुक्तीचा आदेश निघणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख