निवृत्त व्हायच्या आधीच हा अधिकारी भाजपच्या मुलाखतीला आला....

निवृत्त व्हायच्या आधीच हा अधिकारी भाजपच्या मुलाखतीला आला....

पुणे : सामाजिक न्याय विभागाचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मतदारसंघ असलेल्या कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघातून 15 इच्छुकांनी आज मुलखत दिली. कांबळे यांच्याशिवाय सुखदेव अडागळे, अतुल गायकवाड, पाटबंधारे विभागातील आधिकारी पांडुरंग शेलार, विष्णू हरिहर यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. 

भाजपच्या उमेदवारीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक निवृत्त अधिकारीही या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. पांडुरंग शेलार हे पाटबंधारे विभागातील आधिकारी आहेत. निवडणूक लढविण्यासाठी यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आणि ते मुलाखतीला आले. 

विष्णू हरिहर हे भाजपाचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अतुल गायकवाड पुणे कॅन्टोन्मेन्टचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पूर्वीपासून संबंधित आहेत. आंबेडकरी चळवळीशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. कांबळे यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळणार की नाही याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.  त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना त्यांच्या जागी संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण सुनील यांनी तशी इच्छा व्यक्त केली नाही.  

दिलीप कांबळे 
अतुल गायकवाड 
संजय पवार 
सुखदेव अडागळे 
प्रकाश सोनवणे 
किरण कांबळे 
बाप्पू कांबळे 
अतुल गायकवाड 
प्रवीण गाडे 
वर्षा गाडे 
वीरसेन जगताप 
विष्णू हरिहर 
पांडुरग शेलार 
सुनील माने 
मिलींद अहिरे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com