office purasakar | Sarkarnama

तळे राखील तोच पाणी चाखेल

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई: राज्याच्या जलसंधारण विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जल युक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेला पुरस्कारात अधिकाऱ्यांनीच आपली पाठ थोपटून घेतल्याची बाब समोर आली आहे. या पुरस्कारात दोन अधिकारी व दोन कर्मचारी यांना पुरस्कार देण्याची तरतूद असताना चारीही पुरस्कार अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. गंभीरबाब म्हणजे पुरस्काराच्या निवड समितीत असणारे विभागाचे सहसचिव वि. सि. वखारे यांनाच पुरस्कार देणार आहेत. त्यामुळे तळे राखील तोच पाणी चाखेल असा जलसंधारणा विभागाचा अजब कारभार यामुळे समोर आले आहे. 

जलयुक्त शिवार योजनेत महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या गावे, तालुके, जिल्हे, प्रशासकीय संस्था, अधिकारी कर्मचारी, जिल्हा अधिकारी, पत्रकार व व्यक्ती असे एकूण पुरस्कार पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारामध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी 28 सप्टेंबर 2016 या दिवशी मा.फु.अ2013/प्र.क.37/जल-8 या क्रमांकाने दोन शासन दोन दोन प्रसिद्ध करण्यात आले. 28 सप्टेंबर 2016च्या पहिल्या शासन निर्णयामध्ये मंत्रालयीन पुरस्कार देण्याचा कसला निर्णय घेण्यात आलेला नव्हता.मात्र, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी सचिवस्तरावर दुसरा शासन निर्णय तत्काळ घेण्यात येऊन त्यात मंत्रालयस्तरावरच्या पुरस्काराची तरतूद करण्यात आली. या शासन निर्णयामध्ये दोन अधिकारी व दोन कर्मचारी यांना मंत्रालयस्तरावरिल पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार विभागाचे सहसचिव वि. सि. वखारे, अवर सचिव सी. कराड, सहाय्यक कक्षाअधिकारी सुनील गोवळी व अवर सचिव शंकर जाधव या अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्कारामध्ये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यासंबंधीचे सर्व शासन निर्णय अवर सचिव शंकर जाधव यांच्या सहीने संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. एकाही कर्मचाऱ्याला पुरस्कार न देता अधिकारी वर्गाने हे पुरस्कार अगदी वाटून घेतले घेतली की काय अशी शंका व्यक्त करत एका कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यावर आपला रोष व्यक्त केला. जल युक्त शिवार योजनेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेल्या मुख्यालयातच असा प्रकार होत असेल तर क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या पुरस्कारांच्या बाबतीत न बोललेच बरे अशी प्रतिक्रिया ही या कर्मचाऱ्याने दिली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख