गोसेखुर्द घोटाळा; पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, एसीबीची कारवाई

Offences Registered against five officers in Gose Khurd Fraud
Offences Registered against five officers in Gose Khurd Fraud

नागपूर  : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यकारी अभियंत्यासह, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता अशा एकूण पाच अधिकाऱ्यांवर नव्याने गुन्हा दाखल केले आहेत. आतापर्यंत या घोटाळ्यात एकूण अकरा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. एसीबीने महिन्याभरापूर्वी सिंचन प्रकल्पात सात गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये सिंचन विभागाच्या 11 अधिकाऱ्यांचा समावेश होता.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या गैरप्रकारची एसीबी उघड चौकशी करीत आहे. 'गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा 6 ते 30 किमी मधील अस्तरीकरण' या कामात निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे व त्यामध्ये जलसंपदा विभागातील तत्कालीन मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे नागपुरातील सदर पोलिस ठाण्यात आज बुधवारी तत्कालीन पाच अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 निविदा अद्ययावतीकरण करताना पदाचा गैरवापर करीत नियमबाह्य बाबींचा समावेश करून निविदेचे अवैधपणे अद्ययावतीकरण करून निवादा कामाचे मूल्य 855.06 लाखांनी वाढवून गैरव्यवहार करण्यात आला. निविदा अद्ययावतीकरणास मंत्रालयातील वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्तरावर मंजुरी घेणे आवश्‍यक असतानासुद्धा विदर्भ पाठबंधारे विभाग महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी स्वतःच्या स्तरावर निविदेस मंजुरी दिली तसेच निविदा स्विकार करीत गैरव्यवहार केला.

हा सर्व गैरव्यवहार गोसीखुर्द डावा कालवा विभाग वाही, पवनी जि. भंडारा येथील तत्कालिन कार्यकारी अभियंता केशव चंद्रकांत तायडे, तत्कालिन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, तत्कालिन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालिन कार्यकारी संचालक रोहिदास मारोती लांडगे, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी धनराज आत्माराम नंदगवळी यांनी केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक व प्रभारी तपास अधिकारी राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात समन्वय अधिकारी मिलींद तोतरे, मनोज कारनकर, गजानन गाडगे विकास गडेलवार यांनी केली.

यांच्यावर केले गुन्हे दाखल

केशव चंद्रकांत तायडे, संजय लक्ष्मण खोलापूरकर, सोपान रामराव सूर्यवंशी, रोहिदास मारोती लांडगे, धनराज आत्माराम नंदगवळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com