Offence Against Two Pune Corporators | Sarkarnama

अतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी पुण्याच्या दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

जलपर्णी काढन्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेन्द्र निंबाळकर  यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविन्द्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १७ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : जलपर्णी काढन्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेन्द्र निंबाळकर  यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविन्द्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १७ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

जलपर्णी काढण्याच्या निविदेच्या गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने महापौरांच्या दालनात काल दुपारी आंदोलन केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे होते. नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकरांना काही प्रश्‍न विचारले. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी धंगेकर, शिंदे यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांसमोरच निंबाळकर यांना बेदम मारहाण केली.

या संदर्भात राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन धंगेकर, शिंदे यांच्यासह 17 जणावर सरकारी कामात अडथला आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख