आर्डनन्स फॅक्‍टीचे कामागार राज ठाकरेंना भेटले 

आर्डनन्स फॅक्‍टीचे कामागार राज ठाकरेंना भेटले 

मुंबई : ऑर्डनन्स फॅक्‍टरीचे खासगीकरण करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. यामुळे याच निर्णयाविरोधात ऑर्डनन्स फॅक्‍टरीचे कामगार 20 ऑगस्ट पासून संपावर जाणार असून आज या कामगारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीये. 

फॅक्‍टरीचे खासगीकरण झाल्यास कामगारांच्या नोकरीवर गदा येईल असं कामगारांचे म्हणणं आहे. यामुळे आज राज ठाकरेंची भेट घेण्यात आली...देशात एकूण 49 तर महाराष्ट्रात सर्वाधिक दहा ऑर्डनन्स फॅक्‍टरी आहेत व एक लाख कामगार देशात आहेत.

महाराष्ट्रात असलेल्या दहा ऑर्डनन्स फॅक्‍टरीमध्ये पन्नास हजाराहून अधिक कामगार आहे. जर या फॅक्‍टरींचे खासगीकरण झाल्यास कामगाराच्या नोकरीवर गदा येऊ शकते असशी भीती कामगारांमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील पन्नास हजार कर्मचारी संपावर जाणार आहे. ऑर्डनन्स फॅक्‍टरी आर्मीला शस्त्रास्त्र पुरवठा करीत असते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com