obc sensex in maharastra | Sarkarnama

तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ओबीसीची जनगणना करा 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मुंबई ः तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेथील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी ओबीसी संघर्ष समन्वय समितीने केली आहे. 

मुंबई ः तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेथील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी ओबीसी संघर्ष समन्वय समितीने केली आहे. 

राज्यात असलेल्या ओबीसींना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी मागील तीन दशकांपासून ओबीसीची जनगणना व्हावी अशी मागणी केली जात आहे, यासाठी अनेक आंदोलने छेडण्यात आली आहेत. विधानमंडळातही या विषयी मागणी करण्यात आली असून त्यावर अद्याप कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही, त्यामुळे आता तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात ओबीसीची जनगणना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी समितीचे सरचिटणीस राजाराम पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. 

राज्यात ओबीसी समाज हा 52 टक्केहून अधिक असून त्यांची गणना होत नसल्याने त्यातील अनेक जातींना न्याय मिळू शकला नाही. शिवाय राज्यात आणि देशातही मोठ्या प्रमाणावर शिक्षण, नोकरी, उद्योगाच्या क्षेत्रात बॅकलॉग बाकी असून जनगणना झाली तर नेमकी वस्तुस्थिती समोर येईल यासाठी आता तरी सरकारने बाजूच्या राज्याने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

ओबीसी एनटी पार्टीचे अध्यक्ष संजय कोकरे यांनीही तेलंगणा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ओबीसी जनगणनेच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख