भाजपमध्येच ओबीसी नेत्यांचा अधिक मान-सन्मान - उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  

भारतीय जनता पार्टीतच ओबीसी नेत्यांना अधिक मान-सन्मान दिला जात असल्याने भाजपात ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, हा युक्तीवाद चुकीचा असल्याचे मत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भाजपमध्येच ओबीसी नेत्यांचा अधिक मान-सन्मान - उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  

नागपूर : भारतीय जनता पार्टीतच ओबीसी नेत्यांना अधिक मान-सन्मान दिला जात असल्याने भाजपात ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, हा युक्तीवाद चुकीचा असल्याचे मत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नाराजीनंतर भाजपातील ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप वारंवार केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनीही जामिनावर बाहेर आल्यानंतर ओबीसींचे संघटन केल्यामुळे आपल्यावर कारवाई झाल्याचे इशाऱ्यात सांगितले आहे. या संदर्भात भाजपचा बचाव करताना बावनकुळे म्हणाले, ''मी सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आलेलो आहे. गेल्या 20 वर्षांपासून भाजपात आहे. याकाळात पक्षाने माझ्यावर विविध जबाबदाऱ्या दिल्या. अगदी जिल्हा परिषदेपासून मी राजकारण करीत आहे. या पक्षाने मला माझ्या क्षमतेपेक्षा अधिक दिले आहे. त्यामुळे भाजपात ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. काही दुखावलेले नेते असे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात."
 
पक्षासाठी तसेच जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्यांचा भाजपात नेहमीच सन्मान केला जातो. त्यानुसार पक्षात जबाबदाऱ्या मिळत राहतात. पक्षाच्या काही मर्यादाही राहतात. या मर्यादांमध्ये राहून काम केल्यास अन्याय केल्याची भावना नेत्यांमध्ये येणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com