obc bahujan leaders in bjp defeat who is responsible khadase said | Sarkarnama

पक्षांतर्गत पाडापाडीमुळे भाजपचे ओबीसी, बहुजन नेते पराभूत, खडसेंचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पाडापाडीचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने त्यामध्ये भाजपचे ओबीसी आणि बहुजन नेते पराभूत झाले असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. 

पुणे : विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पाडापाडीचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने त्यामध्ये भाजपचे ओबीसी आणि बहुजन नेते पराभूत झाले असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. 

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाबाबत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तर देताना खडसे म्हणाले, की या निवडणुकीत पक्षातीलच काही मंडळींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाया केल्या. त्यामध्ये दुर्दैवाने भाजपचे बहुजन आणि ओबीसी नेते निवडणूक हरले. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. रोहीणी खडसे यांचा पराभव झाला. चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, संचेती यांच्यावर अन्याय झाला. हे असे का झाले याची कारणे तपासली पाहिजेत. हे सर्वजण असते तर 105 आमदारांपेक्षा अधिक आमदार निवडून आले असते आणि आजचे चित्र वेगळे राहिले असते. 

पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे असे स्पष्ट करून खडसे म्हणाले, "" मी पंकजा मुंडे यांची आज भेट घेतली ती कौटुंबिक संबंधातून. कै. गोपिनाथ मुंडे आणि जवळचे मित्र होतो. त्यामुळे आज त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचेही मत असे आहे, की पक्षांतर्गत विरोधाचा फटका निवडणुकीत त्यांना बसला. पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पक्षविरोधात ज्यांनी काम केले अशांची नावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिली आहेत. सात तारखेला पाटील आणि संघटन मंत्री जळगावाला येणार आहेत. अपेक्षा अशी आहे, की त्यांनी चौकशी करून तातडीने कारवाई करावी. 

भाजपमधील वरिष्ठांना मी बोलतोय. मी त्यांच्याशी थेट बोलतोय. मला कोणा मध्यस्थाची गरज नाही. पक्षात जे घडलंय, चाललंय त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. हे मी वरिष्ठांना सांगितले आहे. आता दोषींवर कारवाईची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. मी नाराजांची मोट बांधायची गरजच नाही. पक्षात जे अस्वस्थ आहेत. जे नाराज आहेत ते आपोआपच एकत्र येत आहेत असेही खडसे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख