मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्यांचा ओबीसींना संपविण्याच प्रयत्न : चंद्रकांत बावकर 

मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्यांचा ओबीसींना संपविण्याच प्रयत्न : चंद्रकांत बावकर 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेत्यांचा ओबीसी समाजाला संपण्याचा प्रयत्न असल्याची टीका कुणबी समाजाचे नेते आणि प्रतिनिधी चंद्रकांत बावकर यांनी आज केली आहे. 

मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आले त्याला विरोध करण्यासाठी आज ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार प्रकाश शेंडगे, कॉंग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड आदी उपस्थित होते. 

यावेळी बावकर म्हणाले, की कुणबी आणि मराठा एक आहेत असे मुळीच नाही. दहा तासात कायदा बदला हे चुक आहे. ओबीसी समाजाला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

प्रकाश शेंडगे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणा विरोधात ओबीसी समाज जाणार असून ओबीसी नेत्यांची आज बैठक पार पाडली. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण धोक्‍यात आले आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. कोर्टाने याचिकेवर मत ऐकून घेतले नाही. 

हरीभाऊ राठोड म्हणाले, की मुंबई न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही -निकाल राखीव ठेवण्यात आला. मराठा आरक्षण आम्हाला मान्य नाही. सुप्रीम कोर्टात याच्या विरोधात दाद मागत आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com