नुसरत जहॉ झाली "तीज'च्या मुद्दयावरून धर्मांधांकडून ट्रोल

 नुसरत जहॉ झाली "तीज'च्या मुद्दयावरून धर्मांधांकडून ट्रोल

कोलकाटा : तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहॉं आज सोशल मिडीयावर धर्मांधांकडून ट्रोल झाली. पश्‍चिम बंगालमध्ये "तीज'चा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवविवाहितेच्या दृष्टीने या सणाला खूपच महत्व असते. नुसरत जहॉंची ही पहिलीच तीज आहे. तिचे लग्न जून महिन्यातच झाले आहे. आपल्या पतीबरोबरचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकौंटवर शेअर केले आणि सोशल मिडीयातून तिचवर टीका झाली. 

काहीजणांनी तिला तिच्या मुस्लीम धर्माची आठवण करून दिली. तर काहींनी तिला इस्लाम धर्माची आठवण करून दिली. अत्यंत विखारी आणि द्वेषाने भरलेल्या कॉमेंट तिच्यावर होत होत्या. नुसरत जहॉंला ट्रोल केल्याची ही दुसरी वेळ आहे. काही दिवसापूर्वी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत ती एका पूजेमध्ये सहभागी झाल्याच्या मुद्यावरून तिला ट्रोल तर केले गेलेच पण अतिशय वाईट अशा कडवट टीकेला सामोरे जावे लागले. पश्‍चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेली ही अभिनेत्री निवडून आल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. तिचे पती निखिल जैन प्रसिद्ध व्यावसायिक असून वस्त्रप्रावरणांचा त्यांचा मोठा उद्योग आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com