"तर एनआरसी कायदा शाहूंनी फाडला असता'

....
hasan mushrif about shahu maharaj
hasan mushrif about shahu maharaj

कोल्हापूर : मी पाच वेळा विधानसभेवर निवडून आलो आणि मंत्री झालो. हा तर शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा विजय आहे. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जातीवादाचे बीज शाहू महाराजांनी उखडून टाकले. परदेशी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी मदत केली. एनआरसी कायद्यामुळे सध्या देशात जो काही प्रकार सुरू आहे, तो पाहता शाहू महाराज आज हयात असते तर त्यांनी हा कायद्याच फाडून टाकला असता, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक हे मानवतेचा संदेश देणारे आहे. 2022 मध्ये होणारा त्यांचा शंभरावा पुण्यस्मरण सोहळ्याचा कार्यक्रम हा भव्यदिव्य असेल. तो राज्याला, देशाला, जगाला संदेश देणारा ठरला पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेली केले. उर्वरीत समाधी स्थळाचे काम मंत्री हसन मुश्रीफ आणि मी असे दोघे मिळून पूर्ण करू. अशी, ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

मंत्री थोरात म्हणाले, ""सतेज पाटील यांचे भाषण ऐकल्यानंतर आपल्या ध्यानात आले. असेल की त्यांना पालकमंत्री का केले ? शाहू महाराजांचे सुंदर असे स्मारक इथे उभारले गेले आहे. मानवतेला समतेचा संदेश देणारे हे स्मारक आहे. सहयाद्रीचा कणखर असा दगड स्मारकासाठी वापरला गेला आहे. शाहू महाराजांना अपेक्षित असलेली सगळी वैशिष्टय या स्मारकामध्ये आहेत. अवघ्या 49 वर्षात महाराजांनी कर्तुत्वाने सर्वकाही उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. नंतर इतिहास घडविण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांनी शोषितांची चळवळ उभा केली. कोल्हापुरची गादी सामान्य माणसांसाठी काम करेल, असा संदेश त्यांनी दिला. दलितांना सोबत घेणे, आंतरजातीय विवाह, गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहा पिणे, या बाबी समतेचा संदेश देणाऱ्या होत्या. मूकनायकालाही त्यांनी मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे घटना लिहली. त्या तत्वांचा पाया शाहू महाराजांनी घातला. देशस्तरावरील सध्याचे वातावरण पाहता पुन्हा एकदा देश ताकदवान कसा करता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सहा मे 2022 रोजी शाहू महाराजांचा शंभरावा पुण्यस्मरण सोहळा आहे. तो कोल्हापुरता मर्यादित न राहता, त्याची व्याप्ती देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर जाणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, त्याचा मी ही एक भाग असेन.''

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ""महापालिकेच्या माध्यमातून आम्ही जास्तीचा निधी देण्याचा प्रयत्न केला. सर्वच सदस्यांनी स्वनिधीतून स्मारकासाठी निधी दिला. शंभर वर्षानंतर ही अंगावर रोमांच उभे राहावे, असे काम छत्रपती शाहू महाराज यांनी त्यावेळी केले. आम्ही समाजकारण तसेच राजकारण करतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी विविध भाषेत शाहू ग्रंथ प्रकाशित केला. त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीची गरज आहे. शाहू मिलमध्ये शाहूंचे स्मारक ही आमच्याच काळात व्हावे, असे नियतीने लिहलेले असावे. गेल्या पाच वर्षात काम पुढे सरकले नाही. 2022 पर्यंत समाधी स्मारकाचे काम उर्वरीत काम आहे, ते मंत्री हसन मुश्रीफ आणि मी असे दोघे मिळून पूर्ण करू.''

सिध्दार्थनगर आंबेडकर सभागृहासाठी एक कोटी : संभाजीराजे
खासदार, संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "" छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर या राष्ट्रपुरूषांचा आवाज शरद पवार यांनी दिल्लीपर्यंत पोहचविला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही शाहू महाराजांनी मदत केली. माणगावच्या ऐतहासिक परिषदेतमध्ये डॉ. आंबेडकर हेच दलितांचे नेते असतील, अशी घोषणा शाहूंनी केली होती. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, सिध्दार्थनगर येथील डॉ. आंबेडकर सभागृहांसाठी माझ्या खासदार फंडातून एक कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहे. शाहू महाराजांची व्याप्ती कोल्हापुर मर्यादित नव्हती तर राज्याच्या अन्य भागातही त्यांनी भरीव काम केले. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मागासवर्गीय वस्तीगृहाचा पाया रचला, आजचा दिवस ऐतहासिक असून त्यांचे हे स्मारक जीवनसमाधी ठरावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com