आता कळले असेल सतेज पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री का केले?

balasaheb thorat about satej patil
balasaheb thorat about satej patil

कोल्हापूर : राजर्षी शाहू समाधी लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत झाल्यावर सर्वात प्रथम आपले मनोगत व्यक्त केले.

अत्यंत आवेशपूर्ण, तडाखेबाज, आणि मुद्देसूद भाषण करून त्यांनी सर्वांना प्रभावित केले. सतेज पाटील यांनी सांगितले  की, समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या समाधीचा लोकार्पण सोहळा हा ऐतिहासिक दिवस आहे. या स्मारकासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्ही 3 कोटींचा निधी दिला.उर्वरित कामांसाठी लागणारा 5 कोटींचा निधी  मी आणि नामदार हसन मुश्रीफ मिळून राज्य शासनाकडून मिळवून देऊ.त्यासाठी पवारसाहेब आणि थोरात साहेब यांनी सहकार्य करावे, असे सांगितले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा पाटील यांच्या भाषणावर खूष झाले. त्याचा संदर्भ त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला घेतला .उपस्थितांची नावे घेताना सतेज पाटील यांचा उल्लेख केला. थोरात म्हणाले की सतेज पाटील यांचे भाषण ऐकून त्यांना आम्ही पालकमंत्री का केले हे आता तुम्हाला कळले असेल." थोरात यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून साथ दिली. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आधी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी हे पद नाकारले. त्यानंतर पाटील यांना संधी मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com