Now Uddhav Thakare says , play the video ! | Sarkarnama

उद्धव ठाकरेही म्हणाले ,लाव रे तो व्हिडीओ !

सरकारनामा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

आता जर दोघांचा शत्रू एकच आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी सलोखा करतील का अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली . 

मुंबई :  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक भाषेत हल्ला चढवताना  उद्धव ठाकरेही  म्हणाले लाव रे तो व्हिडीओ !

उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ लावण्याचा आदेश दिल्यानन्तर सर्वांनाच आठवण झाली ती  राज ठाकरे यांची ! भाजपविरुद्ध राज यांच्याप्रमाणेच  उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ आणि ऑडिओचा वापर केला . 

आता जर दोघांचा शत्रू एकच आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी सलोखा करतील का अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली . 

उद्धव ठाकरे म्हणाले ,हरियाणाचे दुष्यन्त चौटाला  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी,  अमित शहा ,आणि गुजराती बांधवांनी विषयी काय बोलले होते हे तुम्ही ऐका आणि मग सांगा की आम्ही असं तर त्यांच्याविषयी काही बोललो नव्हतो ना ? तुम्हाला असे बोलणारे चालतात . त्यांच्या बरोबर तुम्ही सत्ता स्थापन करता . असे म्हणत त्यांनी लाव रे तो व्हिडिओचा नारा दिला . 

 भाजपच्या सर्व नेत्यांनी2014 मध्ये  कुलदीप सिंग  बिष्णोई यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते आणि नंतर त्यांना गंडवले असे सांगून   उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्याला म्हणाले , कुलदीपसिंग बिश्नोईंला कसे गंडवले ते जरा दाखवा. 

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तीन ते चार व्हिडिओ दाखविण्यात आले . उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला एक व्हिडिओ त्यांच्या सहाय्यकाला सापडला नाही . त्यानंतर त्यांनी  व्हिडिओ थांबवले आणि भाजपवर थेट हल्ला चढवला. 

लोकसभेला भाजपबरोबर एकत्र आलो ,त्यांच्या बरोबर गेलो चूक झाली असे मला आता वाटू लागलेले आहे . त्यांना सत्तेची लालसा आहे . सत्तेची लालूच आहे.  त्यामुळे त्यामुळे ते जे ठरले होते ते मान्य करत नाहीत असेही श्री. ठाकरे म्हणाले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याविषयी आपल्याला आदर आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले ,  2014 मध्ये सुद्धा जेव्हा सत्तास्थापनेचा ताण-तणाव सुरू होता तेव्हा मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने फोन आलेला होता.  अरुण जेटली यांनी सुद्धा मला फोन केलेला होता . दुर्दैवाने अरुण जेटली आज आपल्यामध्ये नाहीत . परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मला हे विचारायचे आहे की यांचे खोटे बोलणे कोणत्या हिंदुत्वात बसते ? संघाला  खोटी बोलणारी माणसे कशी चालतात?  खोटारडे हिंदुत्व यांना चालते कसे ? 

देवेंद्र फडणवीस यांचे फोन आपण का घेतले नाहीत याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला खोटे ठरवणाऱ्या माणसाशी मी बोललो नाही आणि बोलणार नाही . तुम्ही म्हणताय की आम्ही काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला दिवसातून तीनदा भेटतोय . म्हणजे  तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत आहेत  का ? आम्ही चोरून काही करत नाही . आम्ही उघडपणे सर्वांना सांगून गोष्टी करतो. 

 भाजपने ही परिस्थिती आज निर्माण केलेली आहे.  नरेंद्र मोदी हे दोन वेळा माझा छोटा भाऊ छोटा भाऊ म्हणाले हे कोणाच्या तरी नजरेमध्ये खुपायला लागले म्हणून हे गैरसमज निर्माण करून दिलेले आहेत . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख