हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा...आता काहींना पालवी फुटली : राज यांना असाही टोमणा

sanjay raut taunts raj
sanjay raut taunts raj

मुंबई ः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. पण, जगतज्जेत्या अलेक्‍झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना गोळा केले. लढण्याची प्रेरणा दिली. आजही जी शिवसेना आहे, ती त्यांच्याच मार्गावर जात आहे. तसेच, त्यांनी हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुह्दयसम्राट म्हणून बाळासाहेब आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याशिवाय, प्रखर हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला. आता अनेकांना पालवी फुटली आहे, काही लोकांना ती फुटू द्या. पण, बाळासाहेबांना आणि शिवसेना यांना तोड नाही. म्हणून फक्त 23 जानेवारीला नाही तर महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेबांचे स्मरण रोज होत असते, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत, असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यासोबत अयोध्येला यावे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com