Now Shivendraraje Criticism on Udayanraje Bhosale | Sarkarnama

बोलबच्चनगिरी करणारा की कामगिरी करणारा खासदार हवा याचा सातारकरांनी विचार करावा : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

राजघराण्यावर लोक प्रेम करतात पण, लोकांच्या भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी खासदार वापर करत आहेत. त्यामुळे आता सातारकरांनी विचार करायला हवा, आगामी निवडणुकीत बोलबच्चनगिरी करणारा खासदार हवा की कामगिरी करणारा खासदार हवा याचा विचार करायला हवा. केवळ भावनांना हात घालून सातारकरांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, अशी टीका साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर केली. 

सातारा : राजघराण्यावर लोक प्रेम करतात पण, लोकांच्या भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी खासदार वापर करत आहेत. त्यामुळे आता सातारकरांनी विचार करायला हवा, आगामी निवडणुकीत बोलबच्चनगिरी करणारा खासदार हवा की कामगिरी करणारा खासदार हवा याचा विचार करायला हवा. केवळ भावनांना हात घालून सातारकरांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, अशी टीका साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर केली. 

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मंडळांना नोटीसा काढून मंगळवार तळ्यात विसर्जन करू नये सांगितले आहे. यापूर्वी पालिकेत सत्ता असलेले खासदार मात्र मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन करा म्हणत आहेत. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''एकीकडे तुम्ही 2015 मध्ये पत्र देताय आमच्या मालकीचे तळे आहे तेथे विसर्जन करू नये. आणि दुसरीकडे तुम्हीच सांगताय की आमच्या मालकीचे तळे असून येथेच विसर्जन करा, कोण कलेक्‍टर कोण प्रशासन मी कोणालाही मानत नाही. मुळात पालिकेने ही सोय करायला हवी होती. पण स्टंटबाजी आणि नौटंकी त्यांची सुरू आहे. भडक बोलायचे आणि मी कसे वेगळे करतोय, प्रशासकीय यंत्रणेला कसे ठोकले हे दाखवायचे असा खासदारांचा प्रकार सुरू आहे."

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, "खासदारांचा लहरीपणाचा कारभार सुरू असून ते पालिकेच्या सत्तेचा मनमानीपणे वापर करत आहेत. राजघराण्यावर लोक प्रेम करत आहेत. लोकांच्या भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करत आहेत. काल जी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यातून आम्हाला हेच दाखवून दिले आहे. बोलबच्चनगिरी करणारा खासदार हवा की सातारकरांसाठी कामगिरी करणारा खासदार हवा, याचा विचार सातारकरांनी केला पाहिजे." केवळ भावनांना हात घालून सातारकरांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख