आमच्याकडे असताना शिवेंद्रराजे दुसऱ्या रांगेत असायचे आता त्यांना मागे बसतात : धनंजय मुंडे 

आमच्याकडे असताना शिवेंद्रराजे दुसऱ्या रांगेत असायचे आता त्यांना मागे बसतात : धनंजय मुंडे 

नागपूर : आमचे शिवेंद्रराजे आमच्याकडे असताना दुसऱ्या रांगेत असायचे मात्र, त्यांना आता मागे बसतात.ज्यांना ते पक्षात घेतात त्यांना सडवले जाते असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला आज काढला. 

भाजला वाटतं की काही तरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ. "" उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद रखो लेकीन साल रखो.'' महाविकासआघाडीचे सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. हे सरकार शब्दाचे पक्के आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा येत नसता हे लक्षात ठेवा. मागील सरकारच्या काळात हजारो शेतकरी दगावले मात्र फडणवीस सरकारने मदत केली नाही.

सरकारचं काय होईल हे बघितले नाही, मात्र पवारसाहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत होते. शेतकऱ्यांचा तळतळाट लागला म्हणून आलेलं(फडणवीस सरकार) सारं गेलं आमच्या सरकारच्या काळात सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार असच्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्‍त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com