now raj thackrey is my friend sanjay raut | Sarkarnama

राज आजही माझे मित्र आहेत, सांगायला काय घाबरतोय का ? : संजय राऊत 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे : राज ठाकरे त्यावेळीही माझे मित्र होते, आजही माझे मित्र आहेत. काय घाबरतो का ? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. 
आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर माझी श्रद्धा आणि विश्वासही आहे असेही ते म्हणाले. 

मुंबईत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुंबईतील गॅंगवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजप, शिवसेनेचे नाते आदी मुद्यावर त्यांनी दिलखुलास मुलाखत दिली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श आणि नेते होते. उद्धव आणि राज हे दोघेही शिवसेनेत होते. पुढे राज यांनी मनसे काढली खरी. मात्र मी शिवसेनेबरोबरच राहिलो. हे खरे आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्धव आणि राज होते. पुढे काही कारणास्तव राज पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली.

 मी राज यांची समजूत काढायला गेलो तेव्हा माझी गाडीही फोडली होती. जे झाले ते झाले. त्यावेळीही राज हे माझे मित्र आहेत. आज आहेत का ? असे विचारले असता राऊत म्हणाले, काय घाबरतो का ? राज आजही माझे मित्र आहे. 

बाळासाहेब आणि शरद पवार हे जनसामान्यांवर पगडा असलेले नेते आहेत. ते विजय खेचून आणू शकतात. परिवर्तन घडवू शकतात यावर माझा पहिल्यापासून विश्वास आहे. महाराष्ट्रात आज तीन पक्षाचे जे सरकार आहे ते खिचडी सरकार नाही. उलट पुलोद सरकार हे खिचडी सरकार होते हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख