Now the opponents should take the lesson, says nidtin gadkari | Sarkarnama

आता तरी विरोधकांनी बोध घ्यावा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा चिमटा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे.

नागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदीच्या विरोधात केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. 

यानंतर काही पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमानाची खरेदी करण्यात येत आहे. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून तरी कमीतकमी राजकारण करू नये. विरोधकांचे आरोप खोटे होते. हे सर्वोच्च न्यायालयाच्याने निकालाने स्पष्ट झाले आहे. आता तरी विरोधकांनी बोध घ्यावा.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राफेल विमान खरेदीवरून उठविलेल्या गदारोळाला समाप्त करावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी विरोधकांना केले. गडकरी यांनी कुणाचेही नाव मात्र घेतले नाही.

माल्ल्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी
बँकेची थकबाकी करून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्ल्या याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

काही न्यूज चॅनेलने दोन वाक्यांची फोड करून वृत्त दाखविल्याने आपण त्यांचा बचाव केला, असे चित्र निर्माण झाले आहे. माल्ल्या यांच्यावर कायदेशीर कारवाईच सुरूच आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्डही चांगला होता. परंतु एका वर्षात तोटा आला. यासाठी अनेक बाबी जबाबदार असतात. परदेशातील व्यापार, देशांतर्गत
बाबींचाही समावेश असतो. त्यामुळे ते फ्रॉड आहे, असे मानू नये, असे मी म्हटले होते. त्याचा गैरअर्थ काढला. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच पाहिजे, याचा पुनरुच्चार गडकरी यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख