फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता महिला पोलिसांच्या खांद्यावर  - now only women police operate faraskhana traffic division | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता महिला पोलिसांच्या खांद्यावर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 मार्च 2020

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतुन हा अभिनव निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे पोलिस दलाकडुन महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनोखे 'गिफ्ट' मिळाले आहे. फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी रविवारपासून (ता. 8) कायमस्वरुपी महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे फरासखाना वाहतूक शाखेचा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती असणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतुन हा अभिनव निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

"जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित महिला अधिकारी व कर्मचारी अतिशय सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडतील. तेथील सर्व प्रकराचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असेल." असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

फरासखाना वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक म्हणून स्वाती थोरात काम पाहणार आहेत. याबरोबरच सहायक पोलिस निरीक्षक एस.पी.जाधव, पोलिस उपनिरीक्षक के.बी.म्हस्के या पोलिस अधिकाऱ्यांसह 36 महिला पोलिस कर्मचारी या ठिकाणी काम करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख