एमआयएमने शिवसेनेची आघाडी तोडली, प्रदीप जैस्वाल पिछाडीवर

एमआयएमने शिवसेनेची आघाडी तोडली, प्रदीप जैस्वाल पिछाडीवर

औरंगाबादः शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात तीस हजारांपर्यत आघाडी घेतलेल्या शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांची ही लीड तोडण्यात एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना सोळाव्या फेरीत यश आले आहे. सोळाव्या फेरीअखेर नासेर सिद्दीकी यांना 68643, तर प्रदीप जैस्वाल यांना 59855 मते मिळाली आहेत.

मध्य विधानसभा मतदारसंघात पहिल्याफेरीपासून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी आघाडी घेतली होती. अकराव्या बाराव्या फेरीत ही आघाडी 30 हजारांवर पोचली होती. पण त्यांनतर मात्र एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांनी ही लीड तोडत 1888 मतांची आघाडी घेतली आहे.

मध्यची जागा कायम राखण्याचे एमआयएम समोर मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले इम्तियाज जलील यांचा हा मतदारसंघ असल्याने एमआयएमने इथे जोर लावला आहे. पण वंचितसोबतची आघाडी तुटल्यामुळे इथे शिवसेनेला कमबॅक करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जाते. मतमोजणीच्या सुरूवातीला शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे अपेक्षित निकाल लागेल असे बोलले जात होते. पण बाराव्या फेरीनंतर शिवसेनेचे मताधिक्‍य घटून एमआयएमने आघाडी घेतली.

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडूण आले होते. यावेळी महायुती असल्याने प्रदीप जैस्वाल यांचा विजय निश्‍चित समजला जातोय. पण एमआयएमने पुन्हा मुंसडी मारल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वंचित आघाडीचे अमित भुईगळ यांना मात्र या मतदारसंघात फारशी चमक दाखवता आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com