मोदींच्या खादीनंतर महाराष्ट्रातही खादीचा नवा ब्रॅंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खादी ब्रॅण्डनंतर आज राज्यातही नव्या महाखादी या ग्रामीण उद्योजकांच्या ब्रॅंडचे आज मंत्रालयात उदघाटन झाले. उद्योगमंत्री सुभाषदेसाई , राज्यमंत्री प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती विशाल चोरडिया यावेळी उपस्थित होते.
मोदींच्या खादीनंतर महाराष्ट्रातही खादीचा नवा ब्रॅंड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खादी ब्रॅण्डनंतर आज राज्यातही नव्या महाखादी या ग्रामीण उद्योजकांच्या ब्रॅंडचे आज मंत्रालयात उदघाटन झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती विशाल चोरडिया यावेळी उपस्थित होते.

राज्यातील ग्रामीण उद्योजकांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूचे खास प्रदर्शन आणि त्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. आज मंत्रालयात लावण्यात आले होते. या स्टॉलला मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासोबतच उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट दिली. खादीचे सर्वात जास्त आकर्षण असलेल्या मधूबन मधापासून कस्तुरबा महिला गटाने तयार खादीचे कपडे, मातीकामाच्या, मेटलपासून बनवलेल्या वस्तू आदीचे स्टॉल दिवसभर मंत्रालयात आकर्षण ठरले.

महाराष्ट्रात महाखादीच्या ही एक चळवळ असून ती ग्रामीण उद्योजकांसाठी एक नवीन संधी असल्याची माहिती संचालक विशाल चोरडिया यांनी दिली. महाखादी या ब्रॅंडच्या नावाखाली राज्यातील ग्रामीण उद्योजकाकडून तयार करण्यात सुमारे 100 च्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या वस्तूंना एक बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे. यासाठी ही उत्पादने लवकरच ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना मिळतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचा बागला यांनी यावेळी दिली.

या महाखादीच्या माध्यमातुन पहिला महाखादीची शॉपी सुरु केली जाणार असल्याची माहितीही बागला यांनी दिली. खादीची कपडे हे आठवड्यातून एकदा सरकारी कर्मचाऱयांना घालण्यासाठी सरकारने परिपत्रक काढले असून त्यासाठीचे कापड सरकारी कर्मचाऱ्यांना सहजपणे उपलब्ध होतील यासाठी विविध ठिकाणी स्टॉल लावले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com