महापालिका आयुक्तानो सावधान - आता तुम्हालाही आहे 'केआरए' - Now KRA to Municipal Commissioners | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिका आयुक्तानो सावधान - आता तुम्हालाही आहे 'केआरए'

अमित गोळवलकर
सोमवार, 22 मे 2017

खासगी कंपन्यांमध्ये 'केआरए'च्य़ा माध्यमातून कर्मचाऱ्यांचे काम मोजले जाते. बढत्या, पगारवाढ यासाठी हे 'केआरए'चे निकष वापरले जातात. तीच पद्धत आता शासनस्तरावर राबवली जाणार आहे. आता महापालिका आयुक्तांची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी त्यांच्याकडून किती प्रभावीपणे पार पाडली जाते, हे पाहण्यासाठीच ही 'केआरए' पद्धत अवलंबण्याचे शासनाने ठरवले असून त्याबाबतचा शासनादेश नगरविकास खात्याने काढला आहे.

पुणे - राज्यातल्या महापालिकाला आयुक्तांचे काम आता मोजले जाणार आहे. खासगी कंपन्यांच्या धर्तीवर आता महापालिका आयुक्तांसाठी 'केआरए' म्हणजेच विशेष फलनिष्पत्ती क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून त्याद्वारे त्यांची गुणवत्ता ठरणार आहे.

खासगी कंपन्यांमध्ये 'केआरए'च्य़ा माध्यमातून कर्मचाऱ्यांचे काम मोजले जाते. बढत्या, पगारवाढ यासाठी हे 'केआरए'चे निकष वापरले जातात. तीच पद्धत आता शासनस्तरावर राबवली जाणार आहे. राज्याच्या नागरी क्षेत्रात सातत्त्याने वाढ होत आहे. या नागरी भागांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून 'स्मार्ट सिटी' किंवा 'अमृत' या सारख्या योजनांमधून शहरांकडे मोठा निधी वळवला जातो आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आता महापालिका आयुक्तांची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी त्यांच्याकडून किती प्रभावीपणे पार पाडली जाते, हे पाहण्यासाठीच ही 'केआरए' पद्धत अवलंबण्याचे शासनाने ठरवले असून त्याबाबतचा शासनादेश नगरविकास खात्याने काढला आहे.

आयुक्तांचे काम मोजण्यासाठी सहा निकष ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक  निकषासाठी गुण असून शंभरपैकी जास्तीत जास्त गुण मिळवणे हे प्रत्येक आयुक्तापुढे आता आव्हान असेल. या गुणांकनाची नोंद आयुक्तांची वार्षिक कामगिरी ठरविण्यासाठी होणार असून गोपनीय सेवा पुस्तकांतही या गुणांची नोंद घेतली जाणार आहे.

हे निकष आणि त्यासाठीचे गुण पुढीलप्रमाणे
विविध करांची वसूली - 20 गुण
महापालिकेच्या स्वउत्पन्नवाढीसाठी विशेष उपाययोजना- 20 गुण
पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे - 10 गुण
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (हागणदारी मुक्त महाराष्ट्र) - 10 गुण
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (घनकचरा व्यवस्थापन) - 30 गुण
सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व अऩ्य प्रशासकीय बाबी - 10 गुण

याबाबतचा सविस्तर शासनादेश वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201705221547311125.pdf

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख