Now Doctors can join Administrative services | Sarkarnama

प्रशासकिय सेवेत दाखल होण्याचा डॉक्‍टरांचा मार्ग मोकळा?

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - राज्यातील शासकीय वैदकीय, आयुष,दंत महाविद्यालयातील डॉक्‍टरांना थेट प्रशासकिय सेवेत दाखल होता यावे, यासाठी सरळसेवा व पदन्नोतीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. यामुळे वैद्यकीय विभागातील प्रशासकीय पदावर डॉक्‍टरांची वर्णी लागणार आहे. या संभावित बदलामुळे वैद्यकीय सेवेवर विपरित परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे.

मुंबई - राज्यातील शासकीय वैदकीय, आयुष,दंत महाविद्यालयातील डॉक्‍टरांना थेट प्रशासकिय सेवेत दाखल होता यावे, यासाठी सरळसेवा व पदन्नोतीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. यामुळे वैद्यकीय विभागातील प्रशासकीय पदावर डॉक्‍टरांची वर्णी लागणार आहे. या संभावित बदलामुळे वैद्यकीय सेवेवर विपरित परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे.

या प्राश्वभूमिवर विभागाने वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकिय अधिकारी पदावर डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंबधी विभागाने वैद्यकीय शिक्षण संचालकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात शासकीय वैद्यकीय, आयुष, दंत महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याबाबत सुचना मागवल्या आहेत. यानुसार महाविद्यालयीन प्रशासकीय अधिकारी या संवर्गात गट - अ व ब च्या नेमणुकीसंदर्भात कार्यपुर्ती आहवाल मागवला आहे. यामुळे आता शासकीय वैद्यकीय, आयुष,दंत महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याची वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी, रूग्णालयातील प्रशासनातील पदव्युत्तर पदवी व किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असा पदस्थापन नियम करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. यामुळे आता डॉक्‍टरांना प्रशासकीय सेवेत पाठवण्याचा शासनाचे चंग बांधला असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात रूग्णांवरील उपचाराकरिता डॉक्‍टरांची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी असताना डॉक्‍टरांना या नव्या जबाबदारात ढकलण्या मागचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. यासंबंधी प्रतिक्रीया विचारली असता, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी "मी एका बैठकीतआहे, याबाबत माहिती घेवून आपल्याशी नंतर बोलतो'असे सांगितले.

सरकारला अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार
ही पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्यात येतात. सध्या संचालनालयाच्या अंतर्गत प्रशासकिय अधिकारी गट अ व ब यांची एकून 63 पदे मंजूर आहेत. या पदांची सेवाप्रवेश नियम सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी) मान्यतेने निश्‍चीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या शासकिय व निमशासकिय अधिकाऱ्यांची सरळसेवा पध्दतीन एमपीएससीद्वारे भरण्यात येतात. सदर मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ या पदाची वेतनश्रेणी 15600 रू. - 39100 रू. ग्रे. वेतन 5400 रू आहे, तर गट ब या पदाची वेतनश्रेणी 9300 - 34800 ग्रे. वेतन 4400 आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापकाची वेतनक्षेणी 37400 रू. - 67000 रू. ग्रे. वेतन 10000 रू. आहे. त्यामुळे वैदकीय क्षेत्रातील पदवीधर या पदावर घेतल्यास सरकारला अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख