थकलेलो नाही, मनाने खचलेलो नाही : राम शिंदे

......
थकलेलो नाही, मनाने खचलेलो नाही : राम शिंदे

कर्जत : ""आतापर्यंत मला जे मिळाले, ते जनतेने दिले. याबाबतीत मी समाधानी आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आणि राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यात कर्जत-जामखेडमधील सर्वांचेच योगदान आहे. मी थकलो नाही आणि मनाने तर अजिबात खचलो नाही,"" असे प्रतिपादन माजी राम शिंदे यांनी केले. 

सद्‌गुरू संत गोदड महाराज मंदिरात शिंदे व युवा उद्योजक संतोष धुमाळ यांच्या हस्ते माध्यान्ह आरती घेण्यात आली. त्या वेळी शिंदे बोलत होते. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, रोजगार हमी समितीचे काका धांडे, उपाध्यक्ष सतीश पाटील, यशवंत शिक्षण संस्थेचे आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. 
शिंदे म्हणाले, ""माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे. ती कायम राहील. समर्थकांनी काही काळजी करू नये, सर्व व्यवस्थित होईल. जनतेचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या संघर्षात सहभागी होऊ. '' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com