डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले : ना भाजपाचा ना कॉंग्रेसचा; मी तर स्वतंत्र खासदार

...
narendra-jadhav
narendra-jadhav

पुणे : कॉंग्रेस सरकारच्या काळात नियोजन आयोगावर काम करण्याची संधी मला मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या काळात खासदार होण्याची संधी मिळाली. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मी ना भाजपाचा ना कॉंग्रेसचा. राज्यसभेतला मी स्वतंत्र खासदार आहे, अशी भूमिका पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज पुण्यात मांडली.

पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानिमित्त डॉ. जाधव आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. डॉ. जाधव यापूर्वी पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम केले आहे. बऱ्याच वर्षांनी ते पुणे विद्यापीठात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, "" पुणे विद्यापीठात कुरूगुरू म्हणून काम करीत असताना भारतीय रिजर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नरपद चालून आले होते. तरीही मी गेलो नाही. शेवटी माझे गुरू माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा आदेश आल्याने नियोजन आयोगावर काम करण्यासाठी मला जावे लागले. कॉंग्रेसच्या काळातही मला देशासाठी चांगले काम करण्याची संधी मिळाली. भाजपाच्या सध्याच्या सत्तेच्या काळातही माजी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, दोन्ही सरकारच्या काळात मला कामाची संधी मिळाली असली तरी मी ना कॉंग्रेसचा आहे ना भाजपाचा.''

गेली काही वर्षे नरेंद्र जाधव सार्वजनिक कार्यक्रमात फारसे सक्रिय नव्हते. पुण्यातही ते क्वचितच येत असत. मात्र, पुणे विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जीवना साधना गौरव पुरस्कारने गौरविण्यात आले. त्यावेळी पुरस्कार देताना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कामाचा उल्लेख करण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी मी राजकीय भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मी न केलेल्या कामाचे क्रेडीट मी घेणार नाही, असे सांगत मी ना कॉंग्रेसचा ना भाजपाचा असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com