Not all well in PCMC BJP | Sarkarnama

भाजपमधील नाराजी उघड, जुन्या नव्यांमध्ये संघर्ष

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 मार्च 2017

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या  भाजपमधील जुना-नवा हा सुप्त संघर्ष काही दिवसांतच समोर आला आहे. आठवड्यापू्र्वीच निवड झालेल्या पालिकेच्या विधी समिती सदस्यत्वाचा भाजपतर्फे दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक शीतल  शिंदे यांनी राजीनामा दिला आहे.

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या  भाजपमधील जुना-नवा हा सुप्त संघर्ष काही दिवसांतच समोर आला आहे. आठवड्यापू्र्वीच निवड झालेल्या पालिकेच्या विधी समिती सदस्यत्वाचा भाजपतर्फे दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक शीतल  शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. तो परत घेणार नसल्यावर ते ठाम असल्याने शहर भाजपमधील हा नवा (आयाराम) आणि जुना  (एकनिष्ठ) संघर्ष पूर्वीच्या मुंडे ,गडकरी वादावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळचे भाजपचे कार्यकर्ते आता चिंतेत आहेत.

मागील पालिका सभागृहात भाजपचे केवळे तीन नगरसेवक होतेत्यातील फक्त शिंदे हेच पुन्हा नव्या सभागृहात आहेत. पक्षाचे जुने व एकनिष्ठ असल्याने महापौर तसेच स्थायीसाठी आपला विचार व्हावाअशी त्यांची इच्छा होती. मात्र, या दोन्ही पदांसाठी त्यांना डावलण्यात आले. एवढेच नव्हे तर या पदी नुकतेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्यांची निवड झाली. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी आपल्या विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे समजते.

प्रभाग मोठा असल्याने तेथे काम करणे सुकर व्हावे, यासाठी आपण राजिनामा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. समिती सदस्यत्वापेक्षाही मोठी पदे इतर नगरसेवक भुषवित असून त्यांचाही प्रभाग तेवढाच मोठा असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाहीयाअगोदरही महापौरपदासाठी भाजपचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते नामदेव ढाके यांना डावलून निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले नितीन काळजे यांना ते देण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती तीन दिवसांपूर्वी  स्थायीचे अध्यक्ष निवडताना झाली. तेथे सुद्धा मूळ भाजप नगरसेवकालाऐवजी शिवसेनेतून आलेल्या सीमा सावळे यांना हे पद  देण्यात आले .त्यानंतर भाजपमधील जुने-नवे संघर्ष चिघळला. त्याची परिणती शिंदे यांच्या वरील राजिनाम्यात झाली आहे.

भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांत पालिका निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये खदखद सुरु असल्याचे वृत्त नुकतेच 'सरकारनामा'ने दिले होते. त्याला भाजपमधील वरील घडामोडीमुळे दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेतील मतभेदही पद न दिल्याने उघड झाले आहेत. स्थायीसाठी मागील वेळी आपल्याला व आता आपल्या मुलालाही (प्रमोद) डावलल्याने शिवसेनेच्या चारुशीला कुटे यांनी पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र केला. त्यांच्याबरोबर माजी  नगरसेविका अॅड. उर्मिला काळभोर व अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे पानिपत झाल्याने शहराध्यक्ष बदलण्याची मागणी 47 पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आहे.तर,राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांचे नेतृत्व झुगारून नगरसेवक दत्ता साने यांनी आपली वेगळी चूल मांडलेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख