...आणि चर्चा रंगली कॉंग्रेसच्या आंदोलनाला झालेल्या गर्दीची !

..
Congress
Congress

कल्याण :  कल्याणमध्ये जिल्हा कॉंग्रेसने शिवसेना - भाजप सरकारच्या कारभाराविरुद्ध केलेले आंदोलन गाजले ते यावेळी जमलेल्या गर्दीमुळे! कल्याणमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन बोटावर मोजता येईल एवढेच कार्यकर्ते जमल्याने फसले!

या आंदोलनात जमलेले नेते ,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या 19 होती की 23  यावर बघ्यांची चर्चा रंगली होती . काही कार्यकर्ते आंदोलन झाल्यानंतर पोहोचले असे एक पदाधिकारी सांगत होता . 

 पेट्रोल-डिझेल दरवाढ, तिवरे धरण दुर्घटना आणि मुंबईमधील मालाड दुर्घटनेत दोषींवर कारवाई न करणे, पीक कर्जवाटपाबाबत बॅंकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता आदी विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले; मात्र तुरळक कार्यकर्तेच या आंदोलनात सहभागी झाल्याने हे आंदोलन फसल्याची चर्चा शहरात होती.

इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बैलबाजार येथील पेट्रोल पंपावर वाहनचालकांना गुलाबाचे फूल दिले. कल्याण तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनामध्ये कांचन कुलकर्णी, रवी पाटील, सुरेंद्र आढाव, कमलाकर शेलार, शकील खान आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, शहरातील समस्या सोडायच्या आणि वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आंदोलन करायचे; मात्र त्यातही बोटावर मोजण्याइतक्‍याच कार्यकर्त्यांचा सहभाग हस्यास्पद असल्याची चर्चा शहरात रंगली होती.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com