North Maharashtra NCP MP Supriya Sule Congratulated Police Personnel who Helped Pregnant Woen | Sarkarnama

हवालदार संजय लोंढेंच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळेंची कौतुकाची थाप!

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

मध्यरात्री प्रसुतीसाठी अडलेल्या महिलेच्या मदतीला धावून, रूग्णालयात तिचे सुखरूप बाळंतपण होण्यासाठी साठी गस्तीवरचे पोलिस हवालदार संजय लोंढे कारणीभूत ठरले. त्यांना फोन करून खासदार सुप्रिया सुळे यांनी खास दूरध्वनी करून कौतुक केले

नाशिक  : मध्यरात्री प्रसुतीसाठी अडलेल्या महिलेच्या मदतीला धावून, रूग्णालयात तिचे सुखरूप बाळंतपण होण्यासाठी साठी गस्तीवरचे पोलिस हवालदार संजय लोंढे कारणीभूत ठरले. त्यांना फोन करून खासदार सुप्रिया सुळे यांनी खास दूरध्वनी करून कौतुक केले. त्या म्हणाल्या, 'तुमचे धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते'

अनेकदा हद्दीच्या वादात तक्रार देण्यास गेलेल्यांची फरफट झाल्याच्या बातम्या नव्या नाहीत. मात्र दोन दिवसांपूर्वी एक कौतुकास्पद काम येथील पोलिसांकडून झाले. मध्यरात्री साडे बाराला भारतनगर येथील शिवाजीवाडी भागात वस्तीवर असलेल्या हवालदार संजय लोंढे आणि शिपाई अत्तार गस्त घालत होते. यावेळी त्यांना एके ठिकाणी गर्दी दिसली. कोरोना संचारबंदी असताना गर्दी असल्याने त्यांनी सगळ्यांना खडसावुन घरात बसण्याची सुचना केली. त्यावर येथील लोकांनी सुनिता काळे या महिलेला प्रसुतीच्या कळा येत आहेत. खुप अडचण आहे. रुग्णवाहिका मिळत नाही अशी अडचण सांगीतली. 

पोलिस आयुक्तांनी दिले बक्षीस

त्यानंतर हवालदार लोंढे यांनी एक दोन वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी पोलिसांची व्हॅन बोलावली. मुंबई नाका पोलिस जाण्याची व्हॅन आल्यावर हवालदार कैलास शिंदे, शिवाजी गुंजाळ यांनी तातडीने महिलेला रूग्णालयात दाखल केले. तिचे सुखरूप बाळंतपण पार पडले. या कामासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व उपायुक्त अमोल तांबे यांनी या कर्मचा-यांना बक्षीस दिले. 

पोलिसांनीही मानले सुप्रिया सुळेंचे आभार

याची माहिती मिळाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोलिसांना फोन केला. त्यांचे कौतुक केले. या  पोलिसांनी खासदार सुळे यांचे आभार मानले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''तुम्ही चांगले काम केले. अडलेल्या महिलेला मदत केली. तुमचे मी आभार मानते. तुमच्या अशा कामांमुळेच आम्हाला कामाची प्रेरणा मिळते.'' या पोलिस कर्मचा-यांना स्वतः खासदार सुळे यांनी फोन केल्याने त्यांची चर्चा तर होणारच. तशी ती झाली ही!

-------

हे देखिल वाचा.....

पुणे : लाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. वाधवा कुटुंबासह २३ जणांना या प्रवासाची परवानगी गुप्ता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर दिल्याचे उघडकीला आल्यानंतर खळबळ उडाली होती...सविस्तर वृत्त येथे वाचा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख