महिलांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांना घरी बसवा : नुरी खान

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय प्रचारात दंग आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी नूरी खान यांनी रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये केली.
महिलांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांना घरी बसवा : नुरी खान

पिंपरी: पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय प्रचारात दंग आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी नूरी खान यांनी रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये केली. 

प्रियांका गांधीचा अपमान करणाऱ्या मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीत महिलावर्गाने घरी पाठवावे, असे आवाहन नूरी खान यांनी केले. ५६ इंच छातीचा आव आणणारे हे पंतप्रधान आतंकवाद मिटवू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेसच्या वतीने  शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत नूरी खान बोलत होत्या. पक्षाचे शहराध्ययक्ष सचिन साठे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संगीता तिवारी, निगार बारसकर, जयश्री पाटील, रेणू पाटील, रुपाली कापसे, महिला कॉग्रेसच्या माजी प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी प्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

नूरी खान म्हणाल्या, गांधी कुटूंबियांच्या दोन पिढ्या दहशतवाद्यांच्या बळी ठरलेल्या असतानाही प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. यावेळी भाजपाच्या लोकांनी महिला भगिनींचे अपमान करणारे वक्तव्य केले. देशातील महिलांचा अपमान करणा-या मोदींना व भाजपला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेने 2019 च्या निवडणूकीत पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुष्मिता देव महिला संघटन व जनजागृती करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com