Non Maratha youth & dismissed workers were active in Aurangabad industrial violence : Danve | Sarkarnama

औरंगाबाद औद्योगिक तोडफोडीत बिगरमराठा व बडतर्फ कामगार: दानवे 

सरकारनामा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात औरंगाबादच्या कारखान्यांची जाळपोळ व तोडफोडीला अनेक कंगोरे पुढे येत आहे.

नाशिक :''  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात औरंगाबादच्या कारखान्यांची जाळपोळ व तोडफोडीला अनेक कंगोरे पुढे येत आहे. आतापर्यंत अटक केलेल्या पस्तीस संशयीतांत सोळा संशयित  बिगर मराठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही बडतर्फ कामगार आहेत. त्यामुळे याचा सखोल तपास व्हावा अशा सुचना दिल्या आहेत," असे  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज श्री. दानवे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते म्हणाले, "मराठा आरक्षण आंदोलनात औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतींत ऐंशी कंपन्यांची तोडफोड व जाळपोळ झाली. त्यासंदर्भात सीसीटीव्हीच्या चित्रणाची तपासणी पोलिस करीत आहेत. "

"त्यातुन आतापर्यंत पस्तीस जणांना अटक झाली. यामध्ये सोळा जणांचा मराठा आंदोलनाशी काहीही संबंध नाही. ते बिगर मराठा आहेत. तोंडाला फडके बांधून, दंडुके घेऊन दहशत पसरवण्याचे काम करीत होते. त्यात अनेक अँगल पुढे येत आहेत. कंपन्यांनी बडतर्फ केलेले कर्मचारीही आढळले. विविध अँगल त्यात पुढे येत आहेत. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्याची पाळेमूळे खोदून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत ,"असे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख