कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आंदोलन त्वरित मागे  घ्यावे : विनोद तावडे 

राज्य शासन शिक्षकांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक आहे. वाढीव तुकड्यांसह विविध मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल.
कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आंदोलन त्वरित मागे  घ्यावे : विनोद तावडे 

नागपूर : राज्य शासन शिक्षकांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक आहे. वाढीव तुकड्यांसह विविध मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केले.

कायम शब्द वगळण्यात आल्यानंतर राज्यातील अनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आणि तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार 1 व 2 जुलै, 2016 ला प्राथमिक व माध्यमिक शाळा अनुदानास पात्र करण्यात आल्या आहेत.

 या शाळांना आणि तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्याबाबतची पुरवणी मागणी जुलै, 2018 च्या नागपूर येथील अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे. शिवाय उच्च माध्यमिक विद्यालयांना20 टक्के अनुदान देणे, 1 व 2 जुलै 2016 नंतरच्या उर्वरित सर्व अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांच्या मूल्यांकनानंतर अनुदानास पात्र घोषित करणे, तसेच ज्या शाळांना यापूर्वीच 20टक्के अनुदान सुरु झालेले आहे, अशा शाळांना पुढील टप्प्यातील अनुदान अदा करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षणमंत्री श्री. तावडे यांची मोर्चातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली होती. श्री. तावडे यांनी मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री. तावडे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत निवेदन करून विविध शिक्षक संघटनांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com