आजचा वाढदिवस : माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना - pradeep jaiswal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार व मध्य विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्रदीप शिवनारायण जैस्वाल यांचा जन्म 28 ऑक्‍टोबर 1960 मध्ये झाला. राजकीय पार्श्‍वभुमी नसतांना ते शिवसेनेत सक्रीय झाले. मुंबईनंतर मराठवाड्यात औरंगाबादेत शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. शहर आणि ग्रामीण भागात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात प्रदीप जैस्वाल यांचा देखील सहभाग होता. संघटनेची विविध पद भूषवल्यानंतर शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली तेव्हा पक्षाने प्रदीप जैस्वाल यांना महापौर पदाची संधी दिली. सर्वात तरूण महापौर होण्याचा मान प्रदीप जैस्वाल यांना मिळाला .

1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत प्रदीप जैस्वाल यांनी विजय मिळवत संसदेत प्रवेश केला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील अकराव्या लोकसभेचे प्रदीप जैस्वाल सदस्य होते. परंतु वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार तेव्हा तेरा दिवसात कोसळले होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली. पण प्रदीप जैस्वाल यांनी अपक्ष लढत विजय मिळवला आणि कालांतराने ते पुन्हा शिवसेनेत आले. पक्षापासून दुरावलेल्या शहर व जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांना पक्षात आणण्याची महत्वाची जबाबदारी सोपवत पक्षाने त्यांना महानगरप्रमुखपद दिले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख