स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी राहुल गांधी करू शकत नाही - फडणवीस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी
देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

वीर सावरकर यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अतिशय बेजबाबदारपणाचे आहे, असे नमूद करून फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मेड इन इंडिया धोरण आता `रेप इन इंडिया' झाल्याची जहरी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर भाजपने लोकसभेत गोंधळ घालत राहुल गांधींकडे माफीची मागणी केली होती. मात्र, नरेंद्र मोदींनी दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हटल्याचे व्हिडिओ ट्विट करीत राहुल गांधींनी मोदींनीच जाहीर माफी मागवी, असे म्हटले. 

त्यानंतर काल कॉंग्रेसने दिल्लीमध्ये आंदोलन आयोजित केले होते. त्यात बोलताना राहुल गांधी यांनी `मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. माफी कदापी मागणार नाही' असे विधान केले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com