Nobody was in a mood hear Ramdas Athavale's famous poems | Sarkarnama

'शीघ्रकवी' रामदास आठवलेंच्या चारोळ्या नको रे बाबा !

सरकारनामा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

रामदास आठवले यांनी पुढे होत ' मी कविता करू काय' असे विचारले.

नवी दिल्ली :  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान कविता म्हणण्याची इच्छा सदस्यांनी होकार दिला नाही म्हणून अपूर्ण राहिली . मात्र अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी आठवलेंना पुन्हा संधी आहे . 

  संसदेतील आपली उपस्थिती हरप्रकारे अधोरेखित करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजही मागे राहिले नाहीत. गोयल आपल्या भाषणात घोषणांचा वर्षाव करत असताना आठवले यांनी राहुल गांधींना उद्देशून वारंवार ' सुनो राहुलजी' असे म्हणत लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न चालविला होता. 

पण राहुल गांधी ऐकायला तयार दिसत नव्हते .  भाषणाच्या अंतिम टप्प्यात गोयल यांनी महाराष्ट्रातील कवीच्या पंक्ती आपण सादर करणार आहोत, असे म्हणताच रामदास आठवले यांनी पुढे होत ' मी कविता करू काय' असे विचारले. संसदेतील भाषणांमध्ये आठवलेंच्या चारोळ्या आधीच चर्चेचा विषय असताना ऐन अर्थसंकल्पी भाषणात त्यांनी दाखविलेला उत्साह सभागृहात चांगलाच हशा पिकवून गेला. पण कोणी त्यांना कविता म्हणण्याचा आग्रह केला नाही . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख