अंधश्रद्धा : ठाण्याचे उपमहापौर पद नको रे बाबा !

एकवेळी स्थायी समितीचे केवळ सदस्यपद दिले तरी चालेल पण उपमहापौरपद नको अशी भूमिका बहुसंख्य सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतल्याचे कळते.
Thane_Mayor_Minakshi_Shinde
Thane_Mayor_Minakshi_Shinde

ठाणे :    सत्ताधारी शिवसेनेत महापौरपदासाठी चढाओढ असली तरी उपमहापौरपद कोणीही स्विकारण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. उपमहापौरपद स्विकारल्यानंतर राजकीय कारकीर्द संपत असल्याची अंधश्रद्घा येथील राजकीय वर्तुळात आहे.

त्यामूळे एकवेळी स्थायी समितीचे केवळ सदस्यपद दिले तरी चालेल पण उपमहापौरपद नको अशी भूमिका बहुसंख्य सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतल्याचे कळते.  

राज्यस्तरावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस अशा महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारावर पडू लागले आहेत. त्यामूळेच एरवी विरोधकांकडे संख्याबळ असो अथवा नसो ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक चर्चेची होत असे. पण यंदा शिवसेनेसोबत थेट राष्ट्रवादी कॉग्रेस असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीकडून यंदा महापौरपदासाठी उमेदवार उभा केला जाणार नसल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली. तसेच महापालिकेतील सत्तेत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करुन घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 महापौरपदासाठी शनिवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत. येत्या 21 नोव्हेंबरला ठाण्याच्या महापौरांची अधिकृत निवड होणार आहे. राज्यातील महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. ठाण्याचे पद खुल्या गटात आल्यानंतर तत्काळ निवडणूक लावण्यात आली आहे.

युतीच्या चर्चेत ठाण्यातून आमदारकी हुकलेले सभागृह नेते नरेश म्हस्के यांनाच महापौरपदावर सधी मिळणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे कळते. पण त्याचवेळी विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक विद्यमान महापौरांना पुन्हा संधी देण्यासाठी आग्रही आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले देवराम भोईर हे देखील महापौरपदासाठी इच्छूक आहेत.

 त्यांच्यामूळे शिवसेनेचे किमान चार नगरसेवक वाढले असल्याने त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना महापौरपदाचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. पण त्याचा अंतिम निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

त्यामूळे शिंदे यांचे पारडे कोणाच्या पारडयात पडणार हे शनिवारी सकाळी अकरा वाजता स्पष्ट होणार आहे. मात्र त्याचवेळी ही निवडणूक यंदा बिनविरोध होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याने शिवसेनेच्या गोटात यंदा धावपळ कमी आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com