हिंदमाता परिसर यंदा जलमुक्त? महापालिकेचा दावा; पर्जन्य जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात

हिंदमाता परिसरातील खोलगट भौगोलिक रचना आणि समुद्राने वेढलेले भौगोलीक स्थान यामुळे पावसाळ्यात पाणी साचते.पाणी सचण्याचा कालावधी कमीत कमी रहावा यासाठी 2017 मध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन करण्यात आले
No Water Clogging at Dadar Hindmata This Monsoon Claims BMC
No Water Clogging at Dadar Hindmata This Monsoon Claims BMC

मुंबई : हिंदमाता परिसरात पाणी तुंबण्याच्या त्रासापासून या वर्षीच्या पावसाळ्यात सुटका होण्याची शक्‍यता आहे. पर्जन्यवाहिन्यांची क्षमता दुपटीने वाढवण्यात येत असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सात किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असा दावा महापालिका अधिकारी करत आहेत. त्यामुळे यावर्षी हिंदमाता परिसरात पाणी तुंबण्याच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हिंदमाता परिसरातील खोलगट भौगोलिक रचना आणि समुद्राने वेढलेले भौगोलीक स्थान यामुळे पावसाळ्यात पाणी साचते.पाणी सचण्याचा कालावधी कमीत कमी रहावा यासाठी 2017 मध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन करण्यात आले.या नियोजनानुसार तासाला 25 मिलिमीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता येत्या पावसाळ्यात दुप्पट म्हणजेच दरताशी 50 मिलिमीटर एव्हडी होणार आहे.यास्तव सुरू असलेली सर्व काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.यामुळे या भागात पाण्याचा निचरा अधिक वेगाने होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास पर्जन्यजल वाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

पाऊस सुरू असतांना भरतीची वेळ असेल तर पाण्याचा निचरा मंद गतीने होतो.त्यामुळे या परिसरात पाणी साचते.ही समस्या लक्षात घेऊन हिंदमाता परिसरात 7 किलीमीटर लांबीच्या पर्जन्यजल वाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.या कामांमध्ये 8 हजार 202 फूट लांबीच्या पुनर्बांधकामाचा समावेश आहे. शिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गालागत बी जे देवरुखकर मार्ग ते मडकेबुवा चौक या दरम्यान 750 मीटर लांब आणि 900 मीमी रुंद व 1200 मिमी उंची असणाऱ्या ब्रिटिशकालीन पर्जन्यजल वाहिन्यांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे.याठिकाणी 3000 मिमी रुंदीची 1200 मिमी उंचीची 'बॉक्‍स ड्रेन' प्रकारची पर्जन्यजल वाहिनी बांधण्यात येत आहे. यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होणार आहे.

तसेच एफ दक्षिण विभागातील लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंत चौक येथील जुन्या कमानी पद्धतीची 3000 मि.मी. रूंदी व 2 हजार 700 मि.मी. उंची असणारी पर्जन्य जलवाहिनी आहे. ही वाहिनी अबाधित ठेवून त्यालगत 1 हजार 800 मि.मी. व्यासाची अतिरिक्त जलवाहिनी बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे या पर्जन्य वाहिनीसाठी तयार करण्यात येणारा बोगदा मायक्रो टनेलिंग पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने जमीन पोखरून तयार करण्यात आला आहे. 

950 मिटर लांबी असलेल्या या पर्जन्य जल वाहिनीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगत यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होण्याचा दावा पालिकेने केला आहे. महर्षी दयानंद महाविद्यालय जंक्‍शन ते साईबाबा जंक्‍शन या दरम्यान 800 मिटर लांबीची व 1 हजार मि.मी. व्यासाची भूमिगत वाहिनी आहे. या पर्जन्य जलवाहिनीचे पुर्नबांधकाम करण्यात येत आहे. त्यानुसार ही पर्जन्य जलवाहिनी सुरूवातीला 1200 मि.मी.व्यास नंतर 1400 मि.मी.व्यास त्यानंतर 1800 मि.मी. व्यास याप्रमाणे उताराकडे बांधण्यात येत आहे. यातील 75 टक्के काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून हे पूर्ण काम 2021 च्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाणी साचण्याची कारणे

हिंदमाता परिसरातील भूभागाची पातळी ही सरासरी सुमारे 27.67 मिटर टी.एच.डी असून त्याभोवतालच्या परिसराची भूभाग पातळी 35 मिटर टीएचडी ते 48.82 मीटर टीएचडी इतकी आहे. त्यामुळे तुलनेने उंच पातळी असलेल्या परिसरातील पावसाचे पाणी हे हिंदमाता परिसराच्या सखोल भागात जमा होते. हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिनीचे मुख आणि त्यापासून सुमारे 7 किमी अंतरावर असणारे ब्रिटानिया पातमुख यांच्या पातळीतील फरक हा सुमारे 2.5 मीटर एवढा आहे. 

शास्त्रीयदृष्ट्या हा फरक अल्प असल्याने सदर पर्जन्यजल वाहिनीचा उतार देखील तुलनेते कमी आहे. परिणामी जमा झालेले पावसाचे पाणी संथगतीने प्रवाहीत होत असल्याने या परिसरातील पाण्याचा निचराही संथ गतीने होतो. यातून मार्ग काढण्यासाठी या परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com