No Toll Collection in Lock Down Period Announces Nitin Gadkary | Sarkarnama

लाॅकडाऊनच्या काळात टोलवसुली नाही; गडकरींचे आदेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

लाॅकडाऊनच्या काळात देशभरातील टोलनाक्यांवरली टोल वसुली स्थगित केली असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात एकवीस दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या सेवा व वस्तूंच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून देशभरातील टोलनाक्यांवरली टोल वसुली स्थगित केली असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 

याबाबत गडकरी यांनी ट्वीट केले आहे. ही टोल वसुली स्थगित केल्याने या वस्तू व सेवांच्या वाहतुकीत सुलभता येईल आणि वेळही वाचेल असे गडकरी यांनी त्यात म्हटले आहे. टोल वसुलीला स्थगिती दिली असली तरीही रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व टोल नाक्यांवरील आवश्यक त्या सेवा सुरु राहतील असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख