No Support of NCP To Ajit Pawar Sharad Pawar Tweets | Sarkarnama

अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा नाही

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी मधून फुटल्याचे संकेत दिले आहेत. तसे ट्वीट त्यांनी केले आहे. 

मुंबई : अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी मधून फुटल्याचे संकेत दिले आहेत. तसे ट्वीट त्यांनी केले आहे. 

तीन पक्षांची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.

यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

भाजपने शिवसेनेचा मध्यरात्री गेम केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला संमती दोन्ही काँग्रेसने दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकार स्थापन केले. राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख