IAS होण्यासाठी मेहनत घ्या; नो शॉर्ट कट - विश्‍वास नांगरे-पाटील 

IAS होण्यासाठी मेहनत घ्या; नो शॉर्ट कट - विश्‍वास नांगरे-पाटील 

नाशिक ः "प्रशासकीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी एकच पर्याय आहे. यशस्वी व्हायचे तर कष्ट करा. मेहनत घ्या. नो शॉर्ट कट' असे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे सुरू असलेल्या ग्रंथालय सप्ताहात "भारतीय प्रशासन ः तरुणांसाठी उत्तम संधी' या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, स्पर्धा परिक्षांत यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप परिश्रम घ्यावे लागतात. "यूपीएससी'च्या परीक्षेमधून 27 वेगवेगळ्या पदांसाठी निवड होत असते. युवकांमध्ये या परीक्षांबद्दल प्रचंड आकर्षण असते. या परीक्षेच्या काळात खूप कठीण टप्पे येतात. मात्र, याची सुरवात जर लहानपणापासून केली, डोळ्यात स्वप्न ठेवले आणि त्याला कष्टाची जोड दिली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन यांनी केले.

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, की जवळपास आठ लाखांपेक्षा जास्त मुले ही परीक्षा देतात. पूर्व परीक्षेत 15 ते 20 टक्के मुले पास होतात. पुढे निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम असते. त्यामुळे काय करायचे यापेक्षा काय करायचे नाही, हे जास्त महत्त्वाचे आहे. आता ही परीक्षा 1750 गुणांची झाली आहे. मुख्य परीक्षेतून एकाला तीन विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलावतात. ही परीक्षा म्हणजे एक चॅलेंज आहे. युद्धाच्या काळात कमी रक्त सांडायचे असेल तर शांततेच्या काळात जास्त मेहनत करा. म्हणजे लहान वयापासूनच तयारी केली तर पुढे त्याचा उपयोग होईल.

यावेळी "सावाना'चे उपाध्यक्ष किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, अभिजित बगदे, श्रीकांत बेणी, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, शंकर बर्वे, गिरीश नातू, वसंत खैरनार उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com