स्वतंत्र पोटनिवडणुकीमुळे उदयनराजेंना फायदा मिळेल?

विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याने सातारा लोकसभेसाठी उत्सुक असलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच पाहायला मिळणार आहे. तरीही स्वतंत्र निवडणूक झाल्यास सध्याचे विरोधातील वातावरण निवळून उदयनराजे यांना फायदा होणार होऊ शकतो, असे बोलले जाते.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

सातारा : विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याने सातारा लोकसभेसाठी उत्सुक असलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच पाहायला मिळणार आहे. तरीही स्वतंत्र निवडणूक झाल्यास सध्याचे विरोधातील वातावरण निवळून उदयनराजे यांना फायदा होणार होऊ शकतो, असे बोलले जाते.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही अटी घातल्या होत्या. यामध्ये  विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक घेण्याची अट टाकली होती. त्यानुसार साताऱ्यातील जनतेला या निवडणुकीबाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादीने तर उदयनराजे विरोधात उमेदवार देण्याची तयारी केली होती. अनेक इच्छुकांनी शड्डू ठोकण्याची तयारी केली. 

पण आज निवडणूक आयोगाने केवळ विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. लोकसभेची पोटनिवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. सध्यातरी उदयनराजे यांचा भाजप प्रवेश जिल्ह्यातील जनतेला रुचलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण जाण्याची चर्चा होती. त्यामुळे पोट निवडणूक स्वतंत्र झाल्यास हे विरोधाचे वातावरण निवळून पुढेहोणाऱ्या निवडणुकीत उदयनराजे यांना फायदा होईल. तसेच विधानसभेत भाजपची सत्ता आली की लोकसभेची पोट निवडणूक उदयनराजे यांना सोपी होणार आहे, अशी ही चर्चा आता साताऱ्यात होऊ लागली आहे. काही असले तरी साताऱ्यातील जनतेची मात्र उत्सुकता आज मावळली. राष्ट्रवादीच्या नेत्यांतून मात्र समाधान व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com