No Reservation on Financial Basis Explains Nitin Gadkary | Sarkarnama

आर्थिक आधारावर आरक्षण नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ट्विटरवर खुलासा 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केले. सरकारमध्येच नोकऱ्याच नसल्याने आरक्षणाचा फायदा काय? असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे गडकरी समर्थकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीच केली नसल्याचे या गडकरींच्या वक्तव्याने स्पष्ट झाल्याचे ट्विटरवरून अनेकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नागपूर : आरक्षणाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावर प्रसार माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तामुळे नितीन गडकरी ट्विटरवर ट्रेंडींग असून जवळपास 11 हजारावर लोकांनी ट्विट केले आहे. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या धोरणाबाबत केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा ट्विटरवर केला.

औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केले. सरकारमध्येच नोकऱ्याच नसल्याने आरक्षणाचा फायदा काय? असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे गडकरी समर्थकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीच केली नसल्याचे या गडकरींच्या वक्तव्याने स्पष्ट झाल्याचे ट्विटरवरून अनेकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक रोजगार निर्मिती होत असल्याचा दावा करीत असताना नितीन गडकरी मात्र रोजगार निर्मिती होत नाही, असे म्हणत असल्याचा दावा करून ट्‌विटरवर 'नितीन गडकरी' हा हॅशटॅग वापरून जवळपास 11 हजारावर ट्‌विट झाले आहेत. यामुळे सध्या ट्‌विटरवर नितीन गडकरी तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडींग होत आहे.

अखेर नितीन गडकरी यांनी ट्विटरवर खुलासा केला आहे. 'काही प्रसारमाध्यमामध्ये माझे विधान प्रकाशित झाले आहे. त्या संदर्भात आपले लक्ष वेधू इच्छितो. आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. जातीवर आधारित आरक्षणावरून आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा कोणताही विचार नाही,' असे नितीन गडकरी यांनी ट्‌विटरवर स्पष्ट केले आहे.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख